नवी दिल्ली | मारुती सुझुकीची हॅचबॅक कार स्विफ्ट नोव्हेंबरमध्ये "बेस्ट-सेलिंग' म्हणजेच सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या कारने हे स्थान कंपनीची पदार्पणातच विक्रीचा उच्चांक प्रस्थापित करणारी कार अल्टोला मागे टाकत मिळवले होते. मात्र, या वेळी ही कार चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय वाहन उद्योगातील अव्वल संघटना सियामच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात एकूण २२,१९१ स्विफ्ट कारची विक्री झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये ही १३,३३७ गाड्यांच्या विक्रीसह सहाव्या क्रमांकावर होती. देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुतीची कॉम्पॅक्ट सेडान डिझायर दुसऱ्या क्रमांकावर होती. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुतीच्या सहा, तर ह्युंदाईच्या चार गाड्या आहेत.

Post a Comment