0
गणेश विसर्जन, दुर्गापूजा, छटपूजेनंतर प्रदूषणात वाढ होत असल्याचा अहवाल

 • नवी दिल्ली- कृत्रिम वस्तूंचा अनियंत्रित वापर व मूर्तीवर घातक रंगामुळे विसर्जनानंतर यमुना नदीत जड धातूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचा इशारा देखरेख समितीने दिला आहे. गणेश विसर्जन, दूर्गापूजा, विविध धार्मिक विधी तसेच छटपूजेमुळे नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ही स्थिती धोकादायक असल्याचे देखरेख समितीने म्हटले आहे. त्याआधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नदीच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती.
  यमुना नदी जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहे. पर्यावरणपूरक वातावरण दिल्याशिवाय नदी पुनरुज्जीवित करता येणार नाही. वर्षातील नऊ महिने या नदीचे काही प्रवाह बंद असतात त्यामुळे प्रत्यक्षात यमुना नदीचे पात्र कमी दिसते. नदी प्रदूषित करणाऱ्याविरुद्ध मोठा दंड आकारला जावा तसेच त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने देखरेख समिती स्थापन केली आहे. रंगीत, चमक दिलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळे व धातूच्या आभूषणांमुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.
  विसर्जनानंतर क्लोरिनच्या प्रमाणात ११ पट वाढ 
  विसर्जनानंतर नदीतील क्लोरिनचे प्रमाण अकरा पटींनी वाढल्याचे दिसले. भारतीय मानक संस्थेने क्लोरिनसाठी (०.०५ एमजी/१) ठरवून दिलेली आहे. कंसात किमान अपेक्षित प्रमाण. विसर्जनानंतर लोखंडाचे प्रमाण ७१ पट जास्त (०.३ एमजी/१), शिशाचे प्रमाण दुप्पट (०.०१ एमजी/१) वाढल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळा(सीबीसीबी)ने म्हटले आहे. गणेश विसर्जनानंतर नदीच्या प्रदूषणात जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे सीबीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे डोळेझाक केल्यास किती धोकादायक स्थिती निर्माण होते याविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.
  विषारी घटकांमुळे मेंदू, फुप्फुस, मूत्रपिंड अवयवांना नुकसान 
  संशोधकांच्या मते जड धातूतील विषारी घटकांमुळे मेंदू, फुप्फुस, मूत्रपिंड, यकृत व अन्य महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचू शकते. दीर्घकालीन परिणामात मेंदू व मज्जासंस्थेतील काठिण्यामुळे होणारे आजार, पार्किन्सन्स, अल्झायमर आजार उद्भवू शकतो. मूर्ती नैसर्गिक वस्तूंपासून तयार केल्या जाव्यात त्यासाठी मातीचा वापर केला जावा. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जाऊ नये, असे सीपीसीबीचे मार्गदर्शक तत्त्व आहे.Pollution increase in 'Yamuna River'

Post a Comment

 
Top