0
समलैंगिकांना बरे करण्याचा दावा करत होता डॉक्टर, उपचारांच्या नावे द्यायला इलेक्ट्रिक शॉक

नवी दिल्ली - दिल्लीच्या न्यायालयाने एका डॉक्टरविरुद्ध समन्स जारी केले आहे. डॉक्टरवर आरोप आहे की, तो समलैंगिकांना इलेक्ट्रिक शॉक देऊन ठीक करायचा. तो लेाकांना सांगायचा की, समलैंगिकता एक 'जेनेटिक मेंटल डिसऑर्डर' आहे. म्हणजेच पिढ्यांपासून चालत आलेला मानसिक आजार. डॉक्टरने 'दिल्ली मेडिकल कौन्सिल'च्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे.

असे आहे प्रकरण...
डीएमसीचे रजिस्ट्रार आणि सेक्रेटरी गिरीश त्यागी यांच्याकडे तक्रार आली होती. या तक्रारीनुसार, डॉक्टर पी. के. गुप्ताची प्रॅक्टिस बॅन करूनही तो दवाखाना चालवत होता. 2015 मध्ये डीएमसीला एक पत्र मिळाले होते, हे पत्र 'नाज फाउंडेशन'च्या कार्यकारी संचालिका अंजली गोपालन यांनी लिहिले होते. अंजली म्हणाल्या होत्या की, डॉक्टर गुप्ता होमोसेक्सुअल्सना हिटरोसेक्सुअलमध्ये बदलण्याचा दावा करतो आणि यासाठी तो होमोसेक्सुअल्सना इलेक्ट्रिक शॉक देतो.

बॅन असूनही प्रॅक्टिस करत होता डॉक्टर...

तक्रारीनुसार, डॉक्टर गुप्ता 2016 पासून बॅन आहे, तरीही तो प्रॅक्टिस करत आहे. यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जावी. जेव्हा कौन्सिलने डॉक्टर गुप्ताला नोटीस पाठवली, तेव्हा तो म्हणाला की, मी डीएमसीला रजिस्टर नाही, यामुळे उत्तर देणे गरजेचे नाही.

आता कोर्टाने डीएमसीच्या डायरेक्टरना मिळालेल्या तक्रारीवरून कारवाई करत डॉक्टर गुप्ताविरुद्ध समन्स बजावला आहे. कोर्टाने म्हटले की, 'डॉक्टर गुप्ता समलैंगिकतेला मानसिक आजार मानतात असे सांगण्यात येत आहे. यासोबतच ते उपचार करण्यासाठी मानसिक हानी करणाऱ्या घटनांबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतात.'

जिल्हा न्यायाधीश अभिलाष मल्होत्रा म्हणाले की, 'ही उपचारांची पद्धत (समलैंगिकांना हिटरोसेक्सुअल बनवण्याची) अत्यंत क्रूर असून बेकायदेशीर आहे.' डॉक्टर गुप्ताला एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.

समलैंगिकता हा आजार नाही...
समलैंगिकता हा काही आजार नाही किंवा अशी मानसिक स्थितीही नाही ज्यातून बाहेर येता येऊ शकेल. जेव्हा तो आजारच नसेल, तर त्यावर उपचार कसे होऊ शकतात? समलैंगिकतेला आजार ठरवून तो दुरुस्त करण्याचा प्रत्येक दावा खोटा आहे.
delhi court summons a doctor who Claims to Cure homosexuality using electric shock Treatment

Post a comment

 
Top