नागपूर- अनैतिक संबंध असलेल्या प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भंडाऱ्या जिलह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा येथे घडली आहे. दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचे गावातील एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. दोघांच्या संबंधांमुळे पुरुषाच्या घरात तणाव निर्माण झाला होता. पुरुषाच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने संबंधित महिला आणि पुरुषाची गावातून दोघांची धिंड काढली.
मिळालेली माहिती अशी की, कोंढा येथे राहणार्या एका पुरुषाचे घराजवळील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिला ही दोन मुलांची आई आहे. दोघांच्या संबंधाची चर्चा गावभर पसरली होती. एवढेच नाही तर पुरुषाच्या घरी वाद सुरु झाले होते. गावातील काही लोकांनी दोघांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु दोघेही समजण्याच्या पलिकडे होते. रविवारी संबंधित महिला थेट पुरुषाच्या घरात आली आणि म्हणाली, 'आम्हाला पती-पत्नीप्रमाणे राहायचे आहे.' यावरून पुरुषाच्या घरा घरात वाद सुरु झाला. पुरुषाच्या कुटुंबियांनी दोघांना रिक्षात बसवून गावातून धिंड काढली. या प्रकरणी संबंधित पुरुषाने अढ्याळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment