0
इंग्रजी शाळेच्या संस्थाचालकाच्या पत्नीने आजाराला कंटाळून शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड.

गेवराई- इंग्रजी शाळेच्या संस्थाचालकाच्या पत्नीने आजाराला कंटाळून शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील जातेगावमध्ये घडली.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कावेरी राधेश्याम चव्हाण (४१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोटाच्या विकाराने त्रस्त होत्या. पती राधेश्याम यांची इंग्रजी माध्यमाची शाळा असून शाळेच्या परिसरातच ते वास्तव्यास आहेत. कावेरी या शाळेचे व्यवस्थापन करण्यात मदत करत असत. शुक्रवारी पहाटे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
Women Suicide case in Gevrai

Post a Comment

 
Top