0
उसाच्या हार्वेेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय

पुणे- साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उसाच्या हार्वेेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. मराठवाड्यात जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत 'व्हीएसआय'च्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. तरीही गेल्या चार वर्षांत एफआरपीची रक्कम देण्यात महाराष्ट्राचे काम चांगले आहे. विजयसिंह मोहिते-पाटील, अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. तरीही गेल्या चार वर्षात एफआरपीची रक्कम देण्यात महाराष्ट्राचे काम चांगले आहे. राज्याने 21 हजार कोटीहून अधिक रक्कम दिली असून, आता केवळ 10 कारखान्यांकडे 77 कोटी बाकी आहेत. तर उत्तर प्रदेशातील कारखान्यांचे 9 हजार 700 कोटी बाकी आहेत. साखरेचा दर प्रति क्विंटल २९०० वरून ३१०० रुपये करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर कमी :
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले, यावर्षी देशात १६० लाख टन साखर शिल्लक असून अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी देण्यात मोठी अडचण येत आहे. साखरेचा दर क्विंटलमागे 2900 रुपये असून, त्यात नजीकच्या काळात सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. उत्पादन खर्च 3300 रुपये असल्याने क्विंटलमागे 400 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर कारखान्यांना एफआरपी देणे मुश्कील होईल. हे पाहता राज्य सरकारने 500 ते 600 कोटी रुपयांची मदत करावी.

आता लोकसभा लढवा, वळसेंंना मुख्यमंत्र्यांचा सल्ला
या कार्यक्रमात राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा धागा पकडत 'आता राष्ट्रीय स्तरावरील पद मिळाल्याने पाटील यांनी लोकसभा लढवावी', अशी मिश्कील प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

मराठवाड्यासाठी अनुकूल वाणावर अभ्यास शक्य
वसंतदादा शुगर ही संस्था उसाच्या नवीन वाणाचे संशाेधन, ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी तंत्रज्ञानावर संशाेधन करते. साखर कारखान्यांची कार्यक्षमता, साखरेची गुणवत्ता वाढवणे, अल्काेहाेल टेक्नाॅलाॅजीवर या संस्थेत संशाेधन होते. ऊस उत्पादक व कारखान्यांसाठी प्रशिक्षण, शिबिरे व अभ्यासदाैरे होतात. कारखान्यांची वर्गणी व राज्य सरकारच्या अनुदानातून ही संस्था काम करते. मराठवाड्यात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून या भागास अनुकूल ठरणाऱ्या उसाच्या वाणांचे संशाेधन व शेती तंत्र अभ्यास हाेऊ शकताे.

Post a comment

 
Top