0
आरोपी ऋषिकेश मोहन कुडाळकर हा विद्यार्थिनीला मागील काही दिवसांपासून त्रास देत होता.

पुणे- सांगली येथील शांती निकेतन ओपन युनिव्हर्सिटीमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला का‍ळिमा फासणारी घटना घडली आहे. प्राध्यापकाने केलेली शरीर सुखाची मागणी पूर्ण न करणार्‍या विद्यार्थिनीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा मृतदेह क्लासरुममध्ये आढळून आला. भिंतीवर डोके आपटून विद्यार्थिनीची हत्या करण्‍यात आल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

प्राध्यापकाने केली होती शरीर सुखाची मागणी..
मिळालेली माहिती अशी की, आरोपी प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर हा मृत विद्यार्थिनीचा एक्स बॉयफ्रेंड आहे. तो तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता. बुधवारी (ता.12) सायंकाळी विद्यार्थिनीचा मृतदेह क्लासरूममध्ये आढळून आला.
अनेकदा बळजबरीही करण्याचा प्रयत्न..
आरोपी ऋषिकेश मोहन कुडाळकर हा विद्यार्थिनीला मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. त्याने तिच्यावर अनेकदा बळजबरीही करण्याचा प्रयत्न केला होता. दोघे एकाच गावात राहात होते.
ऋषिकेशने पोलिसांना सांगितले की, त्याने वैशालीला (नाव बदलले आहे) क्लासरुममध्ये पाहिले. तो क्लासरुममध्ये गेला. त्याने वैशालीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला असता त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यात वैशालीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या हाती कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. त्यात आरोपी क्लासरुममध्ये घुसताना दिसत आहे.Teacher Sexual Harrashment with Girl Student then killed in sangali

Post a comment

 
Top