0
अमेरिकेचा हा दबाव कदापिही मान्य केला जाणार नाही, असे चीनने वारंवार बजावले आहे.

बीजिंग- चीनच्या आर्थिक विकासाचा मार्ग सुरूच राहणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून देशाची त्या मार्गावरून वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच त्यावर कोणालाही आपली 'हुकूमत' दाखवता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे नाव न घेता इशारा दिला.

ग्रँडीओस ग्रेट हॉलमध्ये मंगळवारी आयोजित चीन फेररचनेच्या ४० व्या वर्धापनदिन समारंभात जिनपिंग बोलत होते.त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. देशात एक छत्री व्यवस्था आहे. त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु अशा प्रकारचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. चीनची वाटचाल योग्य पद्धतीने सुरू आहे. इतर देशांकडून आदेश घेण्याची आम्हाला गरज नाही, असे जिनपिंग यांनी सुनावले. जिनपिंग यांनी अमेरिकेचा नामोल्लेख न करता आपली भूमिका स्पष्ट केली. 'चिनी लोकांवर सत्ता गाजवण्याचे प्रयत्न कोणीही करू नयेत. चिनी लोकांनी काय करावे किंवा काय करू नये, हे शिकवण्याचीही गरज नाही, असे चीनचे धोरण आणि वाटचाल राहिली आहे. माओ झेडाँग यांच्या कार्यकाळापासून ही वाटचाल सुरू आहे, असे जिनपिंग यांनी सांगितले. चीन व अमेरिका यांच्यात व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने चीनवर दबाव वाढवत आहे. अमेरिकेचा हा दबाव कदापिही मान्य केला जाणार नाही, असे चीनने वारंवार बजावले आहे.

जागतिक शांततेत योगदान
जागतिक शांततेत चीनचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर चीनने जागतिक विकासातही आपले योगदान दिले आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीतही चीनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
America should not rule 'China'

Post a comment

 
Top