शेतातील काम करुन घराकडे परतणाऱया महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यावर तिच्यावर गळय़ावर चाकूने वार केले. सुदैवाने या हल्ल्यात महिला थोडक्मयात बचावली आहे. अशोक वाघेला असे आरोपीचे नाव आहे. डहाणूमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर सोमवारी पहाटे स्थानिकांनी आरोपीला शहरातील सेंट मिरीज हायस्कुलजवळ पकडले. मात्र वाणगाव पोलिसांना तात्काळ खबर देऊनही, ते उशिरा पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारिका बारी असे या हल्ला करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. आरोपी चोरीच्या उद्देशाने सारिका यांच्या शेतावर गेला होता. तिने हटकल्यावर तो तिथून निघून गेला. मात्र ती घराकडे निघाली असता, त्याने तिचा पाठलाग करून सोनसाखळी चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यात झटपट होऊन तिने चोरीचा डाव हाणून पाडताच, त्याने चाकूने तिच्या गळय़ावर वार केले आणि तो पसार झाला. ती रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे एका ग्रामस्थाने पाहिले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात तिच्या गळय़ाला तब्बल 16 टाके पडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पोलिसात तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गावाशेजारी राहणारा अशोक वाघेला या हल्ल्यामागे असल्याची माहिती समोर आली. यानंतर स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला आणि पहाटे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला.

Post a Comment