0
भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, हा निर्णय निरंकुशतेला मिळालेली चपराक आहे.

कोलकाता - कलकत्ता हायकोर्टाने गुरुवारी भाजपध्यक्ष अध्यक्ष अमित शहांच्या रथयात्रांना पश्चिम बंगालमध्ये मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतर भाजपने हायकोर्टात धाव घेतली. सिंगल बेंचने या यात्रेवर बंदी लावली होती. त्यानंतर पक्षाने मोठ्या बेंचकडे अर्ज केला होता. ही रथ यात्रा राज्याच्या 24 जिल्ह्यांतून जाणार आहे. भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, हा निर्णय निरंकुशतेला मिळालेली चपराक आहे.


40 दिवसांत 294 विधानसभा मतदारसंघात फिरणार
राज्य सरकारने रथ यात्रेच्या परवानगीसंबंधी भाजपच्या पत्रांचे उत्तर दिले नव्हते. त्याबाबतच्या आधीच्या सुनावणीत हायकोर्टाने सरकारला फटकारले होते. त्यावेळी राज्य सरकारने कोर्ट असा युक्तीवाद केला होता की, भाजपच्या रथ यात्रेमुले धार्मिक तणाव पसरू शकतो.


शहा रथयात्रेच्या माध्यमातून 40 दिवसांत 294 विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहेत. ही रथयात्रा 7 डिसेंबरला कूचबिहारहून, 9 डिसेंबरला दक्षिण 24 परगनाच्या काकद्वीपहून आणि 14 डिसेंबरला तारापीठहून रवाना होणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली होती.
Calcutta High Court gives nod to Rath yatras of BJP in WB

Post a Comment

 
Top