0
कित्तेक ठिकाणी पोलिसापेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्व दिले जाते अशावेळी मला माझ्या मुलांची काळजी वाटते - नासिरुद्दीन

मुंबई : अभिनेता अनुपम खेर यांनी शनिवारी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, "देशात एवढे स्वातंत्र्य आहे की, तुम्ही सेनेला शिव्या देऊ शकता, वायुसेना प्रमुखाला वाईट साईट बोलू शकता आणि जवानांवर दगड फेकू शकता. देशात अजून किती स्वातंत्र्य हवे आहे ?" ते म्हणाले की, "त्यांना (नासिरुद्दीन) जे वाटते ते योग्यच आहे असे नाही."

नसीरुद्दीन शाहने एका मुलाखतीत म्हंटले होते, कित्तेक जागांवर पोलिसांच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्व दिले जाते. देशात विष पसरले आहे. लोकांना कायदा हातात घेण्याची मोकळीक मिळाली आहे. याची काळजी वाटते की ही परिस्थिती लवकर सुधारतात दिसत नाहीये."

नासिरुद्दीन शाह म्हणाले होते..
नासिरुद्दीन शाह : "मला धार्मिक शिकावं मिळाली होती. पण रत्ना (पत्नी) ला नाही. मी माझ्या मुलांना धार्मिक शिकावं नाही दिली, कारण माझी मान्यता आहे की चांगुलपणा आणि वैतपण याचा धर्माशी काहीही संबंध नसतो. मला काळजी वाटते माझ्या मुलांची की, जर कधी एखाद्या गर्दीने त्यांना घेरले आणि विचारले, हिंदू आहेस की मुस्लिम तर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल. मला याची काळजी वाटते कारण ही परिस्थिती लवकर सुधारताना दिसत नाही. या गोष्टींची मला भीती वाटत नाही, राग येतो.''
anupam kher gives answer to naseeruddin shah's statement

Post a Comment

 
Top