0
आला रे आला... ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सिंबा आला

आतापर्यंत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सुपर एंट्री करुन ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर सर्वांना सरप्राईज केले. ‘आला रे आला सिंबा आला’ असा आवाज ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर घुमला कारण या मंचावर सिंबाने सरप्राईज एंट्री करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले.


नेहमीच उत्साही असणारा संग्राम भालेराव उर्फ रणवीर सिंह याने कळत-नकळतपणे ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर जाऊन सर्वांना सरप्राईज करण्याचे ठरविले होते आणि तो सेटवर येणार याचा त्याने कोणाला थांगपत्ताही लागू दिला नव्हता. आपण ज्या ठिकाणी शूट करतोय, त्याच ठिकाणी ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे ही शूट चालू आहे असे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याने लगेच ‘सरप्राईज एंट्री ’चा प्लॅन तयार केला. या निमित्ताने त्याची चाहती अमृता खानविलकरलाही भेटणं होईल आणि स्पर्धकांना सरप्राईज देता येईल असं ठरवूव सिंबाने ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर एंट्री मारली.


अमृता खानविलकर रणवीर सिंहची खूप मोठी चाहती आहे आणि प्रत्येकवेळी रणवीरला सपोर्ट करुन अमृताने हे दाखवूनही दिले आहे. त्यामुळे अचानकपणे, कसलीही पूर्व कल्पना न देता रणवीर सिंह थेट समोर उपस्थित राहणे यासारखे सुंदर सरप्राईज अमृतासाठी कोणतेही नसेल. अमृताशी गप्पा-गोष्टी रंगल्या नंतर, आपल्या सुपर स्पर्धकांच्या उत्साहाला दाद देत रणवीरने त्यांच्यासोबत सेल्फी-फोटो काढले. अशाप्रकारे काही मिनिटांचे हे सरप्राईज एक कायमस्वरुपी आठवण भेट म्हणून रणवीर याने सोनी मराठी कुटुंबाला दिली.Ranveer Singh Surprise Entry In Marathi Reality Show Super Dancers Maharashtra

Post a Comment

 
Top