0
याइर नेतन्याहूने फेसबूकच्या या कारवाईला तानाशाही कारभार म्हटले आहे.

तेहराण - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा याइर नेतन्याहूला (27) फेसबूकने ब्लॉक केले आहे. याइर नेतन्याहूने केलेल्या सोशल मीडियावर पोस्ट धार्मिक भावना दुखावणाऱ्या होत्या. त्यामुळे, ही कारवाई करण्यात आली असे फेसबूकने लिहिले. 24 तास ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडिया कंपनीने अकाउंट पुन्हा सुरू केले. परंतु, ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली. इस्रायलच्या पंतप्रधानांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. तर त्यांचा मुलगा याइर नेतन्याहूने फेसबूकच्या या कारवाईला तानाशाही कारभार म्हटले आहे. सोबतच, ट्विटरवर अनेक प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत.


मुस्लिमांवर केली होती अशी पोस्ट...
- पॅलेस्टाइनच्या सीमावर्ती भागांत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची चर्चा सुरू असतानाच याइरने ही पोस्ट केली होती. तत्पूर्वी दोन पोलिस जवानांचा गोळीबारात मृत्यू झाला. त्यावर लिहिताना त्याने मुस्लिमांना मानवी वेशात मॉन्स्टर म्हटले होते. सोबतच सर्वच मुस्लिमांना इस्रायल सोडून जाण्यास सांगितले होते.
- याइर म्हणाला होता, "की गाझा पट्टीवर शांतता कायम ठेवण्याचे फक्त दोन पर्याय आहेत. पहिला ज्यूंनी इस्रायल सोडावे किंवा दुसरा मुस्लिमांनी देश सोडावा. मी दुसरा पर्याय निवडतो आणि सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पोलिसांच्या हत्येचा सूड घ्यावा."
- याही पुढे जात याइर म्हणाला, "जगात फक्त दोन देशांमध्ये दहशतवादी हल्ले होत नाहीत. पहिला आइसलंड आणि दुसरा जपान.... विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणी मुस्लिम नाहीत." फेसबूकने त्याच्या या पोस्ट आपल्या अटी-शर्तींचे उल्लंघन म्हणत डिलीट केले आहेत.


ज्यूंविरोधातही लिहिल्या होत्या पोस्ट
याइर नेतन्याहूचे फेसबूक आणि ट्विटर पेज मुस्लिम आणि पॅलेस्टिनींविरोधात पोस्टने भरलेले आहे. आपल्या भडकाऊ सोशल मीडिया पोस्टमध्ये तो नेहमीच चर्चेत असतो. केवळ मुस्लिम विरोधीच नव्हे, तर एकदा तो ज्यू समुदायाच्या विरोधात पोस्ट करूनही टीकेचा लक्ष्य बनला होता. गतवर्षी त्याने सर्वच एनजीओंना देशद्रोही म्हणत एक फोटो पोस्ट केली होती. त्यामध्ये ज्यू समुदाय आणि ज्यू फायनांसर संदर्भात वादग्रस्त कार्टून दाखवले होते. टीका होताच त्याने ही पोस्ट डिलीटही केली होती.
Israeli PM Son temporarily banned from Facebook for anti-Muslim posts

Post a comment

 
Top