0
या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजीच होणार आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील एखा कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. इंडियन रेल्वेच्या कॅन्टीन आणि पर्यटन IRCTC घोटाळा प्रकरणात खटला सुरू असताना त्यांना 19 जानेवारीपर्यंतचा जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने खटला दाखल केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी यांच्यासमोर रांची येथील जेलमधून व्हिडिओ काँफ्रेंसिंगच्या माध्यमातून लालूंची हजेरी लावण्यात आली होती. दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात असलेले लालू आरोग्यांच्या समस्येमुळे दिल्लीच्या कोर्टात प्रत्यक्ष हजर राहू शकलेले नाहीत.


IRCTC आणि दुसऱ्या अशा दोन्ही प्रकरणांत सामान्य जामीन मिळवण्यासाठी सुद्धा लालूंनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात सुनावणी घेताना कोर्टाने ईडी (अंमलबजावणी संचलनालय) आणि सीबीआयला आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. लालूंवर रेल्वे मंत्री असताना रेल्वे कॅन्टीन आणि हॉटेलांचे कंत्राट खासगी कंपन्यांना देताना गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. कोर्टाने यापूर्वी सीबीआयने दाखल केलेल्या एका खटल्यात लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना सामान्य जामीन मंजूर केला होता. तर ईडीकडून दाखल झालेल्या खटल्यात ते अंतरिम जामीनावर आहेत. त्या दोघांच्या जामीनाची मुदत सुद्धा 19 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजीच होणार आहे.RJD chief Lalu Prasad granted interim bail by Delhi court

Post a Comment

 
Top