0
रोज असे शेकडो कॉमेंट्स वाचून शॅरी लोकांना सत्य काय आहे ते सांगते. मी पोलिसाची नोकरी सोडली असून फिटनेसवर लक्ष केंद्रीत कर

न्यूयॉर्क - प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. पण अनेकदा सौंदर्य त्रासाचे कारणही ठरत असते. न्यूयॉर्कच्या सेरमिन केन्टमॅन हिचीही अशीच कथा आहे. लोक तिला शॅरी नावाने ओळखतात. 9 वर्षे न्यूयॉर्क पोलिसांत अधिकारी राहिलेल्या शॅरीच्या सौंदर्याचे लोक वेडे आहेत. तिच्या इन्स्टाग्राम पोटो पाहून तर फॅन्स एवढे वेडे झालेत की, मुद्दाम कायदा तोडून तिच्या हाताने अटक व्हायची तयारी दाखवत आहेत. या सर्वाला कंटाळून शॅरीने नोकरी सोडली आहे.


18 वर्षांची असताना बनली होती अधिकारी
सध्या 27 वर्षांच्या असलेल्या शॅरीने 9 वर्षांपूर्वी न्यूयॉर्कचे मॅट पोलिस डिपार्टमेंट जॉइन केले होते. त्यादरम्यान तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेस आणि वर्कआउट फोटोज पोस्ट करायला सुरुवात केली. तिचे सौंदर्य पाहून लोक ती पोलिस अधिकारी आहेत यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. लोकांनी ती मॉडेल असेल असेच वाटायचे.


येऊ लागल्या मॉडेलिंगच्या ऑफर
शॅरीच्या सौंदर्यावर फिदा होऊन अनेक अॅड आणि मॉडेलिंग एजन्सींनी तिला संपर्क केला. तिला अनेक ऑफर मिळायला लागला. तेव्हा तिला तिच्या टॅलेंटबाबत अंदाज आला. त्यानंतर शॅरीने पोलिसांची नोकरी सोडली आणि मॉडेलिंगमध्ये नाव कमावत आहे.


फॅन्सला माहिती नव्हती ही बाब
शॅरीच्या बहुतांश फॅन्सना ती अजूनही पोलिस ऑफिसर आहे असेच वाटते. लोक तिला मॅडम आम्हाला अटक करा असे म्हणतात. रोज असे शेकडो कॉमेंट्स वाचून शॅरी लोकांना सत्य काय आहे ते सांगते. मी पोलिसाची नोकरी सोडली असून फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे ती सांगते.


बिकिनी फोटोज व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार शॅरीचे अनेक बिकिनी फोटोज व्हायरल होत आहेत. त्यात ती अजूनही पोलिस असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फॅन्सच्या संख्येच प्रचंड वाढ होत आहे.


जर्मनीची अधिकारीही सौंदर्याला कंटाळली होती
यापूर्वी जर्मनीची सुंदर महिला पोलिस ऑफिसर अॅड्रिएन कोलेसजरच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तिचे सौंदर्य तिच्या जॉबसाठी अडचणीचे ठरले. 34 वर्षीय अॅड्रिएन इन्स्टाग्रामवर नियमितपणे फोटो अपलोड करत होती. पोलिस डिपार्टमेंटने तिला एक तर कामावर लक्ष दे अन्यथा राजीनामा दे असा इशारा दिला होता.another Beautiful Former Police Officer is now social Media sensation

Post a Comment

 
Top