बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत विवाहबद्ध झाली. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. आता त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये निक आणि प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहेत. ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या लग्नात वर-वधू निक आणि प्रियांका यांनी रॉल्फ लॉरेनने डिझाइन केलेले आउटफिट कॅरी केले होते. या फोटोत प्रियांका निकचा हात पकडून चालताना दिसत आहे. तर हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नात प्रियांकाने रेड कलरचा सुंदर लहेंगा घातला होता. तर निक गोल्डन कलरच्या शेरवानीत दिसला. हे फोटोज आणि व्हिडिओज पीपल मॅगझिनने प्रकाशित केले आहेत.

Post a Comment