वचपा घेण्यासाठी जणांनी युवकाला गावातच बेदम मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
अमरावती- बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हसला गावात बकऱ्या चारण्याच्या वादातून ३२ वर्षीय युवकाचा गावातीलच एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वेळी त्या युवकाने थापड मारली. याच थापडेचा वचपा घेण्यासाठी पाच जणांनी युवकाला गावातच बेदम मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
शुद्धोधन माणिकराव वानखडे (३२, म्हसला) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोलू चैतू धुर्वे (३०), सुरेश शामलाल धुर्वे (३५), ज्ञानचंद्र गुलाबराव धुर्वे (२२), सुरेश सोमाजी उंबरकर (३५) आणि अंकुश जानराव वाघमारे (२१, सर्व रा. म्हसला) यांना अटक केली आहे. शुद्धोधन हा बकऱ्या चारण्याचे काम करीत होता.. शुक्रवारी दुपारी शुद्धोधनचा गावातीलच चैतू धुर्वेसोबत याच कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी शुद्धोधनने चैतू धुर्वेला थापड मारली होती. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शुद्धोधन घरी आला रागारागाने चैतू धुर्वेच्या घराकडे गेला. त्यावेळी पुन्हा शुद्धोधन आणि चैतू धुर्वे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शुद्धोधन घराच्या दिशेने येत असताना चैतू धुर्वेचा मुलगा गोलू व त्याचे इतर चार नातेवाईक हे शुध्दोधनच्या मागे आलेत व त्यांनी रस्त्यातच शुध्दोधनसोबत वाद घातला. वाद वाढताच गोलू व इतर चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. यातच शुद्धोधन रक्तबंबाळ झाला. दरम्यान शुध्दोधनला गंभीर अवस्थेत इर्विनमध्ये दाखल केले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणात शुध्दोधनचे वडील माणिक शंकररराव वानखडे यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी पाचही जणांविरुध्द शुक्रवारी रात्रीच खुनाचा गुन्हा दाखल करून रात्रीच पाचही जणांना अटक केली. या पाच जणांना शनिवारी (दि. १५) न्यायालयासमोर हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
म्हसल्यात क्षुल्लक कारणावरून खून
म्हसला गावात बकऱ्या चारण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुद्धोधन वानखडे या युवकाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. यामध्ये पाच जणांना अटक केली आहे. शरद कुलकर्णी, ठाणेदार, बडनेरा.

Post a Comment