0
सिंधूने आपल्या करिअरमध्ये सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेतील पदक आपल्या नावे निश्चित केले.

ग्वांग्झू- दाेन वेळच्या पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने शनिवारी उल्लेखनीय खेळीच्या बळावर दुसऱ्यांदा वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेची फायनल गाठली. यासह तिने आपल्या करिअरमध्ये सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेतील पदक आपल्या नावे निश्चित केले. दाेन वेेळच्या उपविजेत्या सिंधूची नजर आता किताबावर लागली आहे. भारताच्या समीर वर्माचे आव्हान संपुष्टात आले. यासह त्याचे पदकाचे स्वप्न भंगले.


समीरचा पराभव:
समीर वर्माने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात दमदार सुरुवात करताना आघाडी घेतली. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला. ऑल इंग्लंड चॅम्पियन युकीने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात समीरवर १२-२१, २२-२०, २१-१७ ने मात केली.

५४ मिनिटांत फायनलमध्ये :
भारताच्या २३ वर्षीय सिंधूने ५४ मिनिटांत शर्थीची झुंज देत महिला एकेरीची फायनल गाठली. तिने लढतीमध्ये थायलंडच्या रत्नाचाेक इंतानाेनवर मात केली. तिने २१-१६, २५-२३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिला अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. याशिवाय सिंधूने आपल्या करिअरमध्ये इंतानाेनविरुद्ध विजयाचे रेकाॅर्ड आता ३-४ असे केले. आता तिचा फायनल मुकाबला आज रविवारी ओकुहाराशी हाेणार आहे.Sindhu entered final in Badminton

Post a comment

 
Top