सूरत : सूरतमध्ये पिकनिकला गेलेल्या मुलांच्या बसला अपघात झाला. या अपघातात 7 मुले, दोन मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमरोली येथील सोसायटीमधून तीन अंतयात्रा निघाल्या. 18 वर्षीय तृषासोबत 4 वर्षीय ध्रुवा आणि तिची आई होती. हेमाक्षीच्या लग्नानंतर अनेक नवस केल्यावर ध्रुवाचा जन्म झाला होता. रविवारी तिला अखेरचे कुशीत घेतले होते.....पण शाळेत जाण्यासाठी नव्हे तर...जीवनाच्या अखेरच्या प्रवासावर नेण्यासाठी कुशीत घेतले होते. तिच्यासोबतच तिची आई पण होती.
अमरोली येथील एका सोसायटीमधून दोन मुली आणि एका महिलेची अंतयात्रा निघाली होती. यामध्ये आई हेमाक्षी पटेल आणि तिची 4 वर्षाची मुलगी ध्रुवा तिरडीवर होत्या. अंतयात्रेवेळी काजळ आणि केसात फुलांचा हेअरबँड लावून ध्रुवाचा मेकअप करण्यात आला होती. आपल्या आईसोबत ध्रुवाची अंतयात्रा निघाली तेव्हा लोक सुन्न झाले होते.
परिवारावर कोसळा दुःखाचा डोंगर
कालपर्यंत हेमाक्षी ध्रुवाला बाहुलीप्रमाणे सजवून शाळेत पाठवत होती. पण आज हेमाक्षी आणि ध्रुवाचा केलेला शृंगार पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी सगळीकडे सुन्न वातावरण झाले. ध्रुवाच्या आजींना यावेळी सांभाळणे कठीण झाले होते. वयाच्या या टप्प्यावर असाही दिवस पहावा लागेल असा विचारही त्यांनी केला नव्हता. देवाने 12 वर्षानंतर नातीचे सौभाग्य दिले होते. पण आता त्यानेच ही वाईट वेळ आणली होती. या अपघतात एक-दोन नाही तर नऊ घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment