0
बनावट दारू रोखण्यासाठी जालन्यात राज्य उत्पादन शुल्कची ३ पथके

जालना - काही दिवसांपासून बनावट दारू निर्मितीचे विविध गुन्हे पोलिस प्रशासनाने उघडकीस आणले आहेत. कारवाया होऊनही पुन्हा त्याच ठिकाणी नवनवीन अड्डे उभे राहत आहेत. आरोग्यास हानिकारक ठरत असलेल्या स्पिरिट, लेबलचा वापर करून बनावट दारू तयार करणारे एक्स्पर्ट जिल्ह्यात कार्यरत झाल्याचे आठवडाभरातील दोन गुन्ह्यांतून समोर आले आहे. दरम्यान, आता 'थर्टी फर्स्ट' असल्यामुळे बनावट दारू विक्री होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने चांगलीच दखल घेतली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन पथके स्थापन करून पंधरा पोलिसांवर याची जबाबदारी दिली आहे.

जिल्ह्यात तयार होत असलेल्या बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असू शकतो. आठवडाभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी मंठा रोडवर केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष हे दोघेही मुंबईचे असून, बनावट दारू तयार करण्यापुरतेच हे या ठिकाणी थांबत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या कारवायांमध्ये ४७५ जणांवजालना - काही दिवसांपासून बनावट दारू निर्मितीचे विविध गुन्हे पोलिस प्रशासनाने उघडकीस आणले आहेत. कारवाया होऊनही पुन्हा त्याच ठिकाणी नवनवीन अड्डे उभे राहत आहेत. आरोग्यास हानिकारक ठरत असलेल्या स्पिरिट, लेबलचा वापर करून बनावट दारू तयार करणारे एक्स्पर्ट जिल्ह्यात कार्यरत झाल्याचे आठवडाभरातील दोन गुन्ह्यांतून समोर आले आहे. दरम्यान, आता 'थर्टी फर्स्ट' असल्यामुळे बनावट दारू विक्री होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने चांगलीच दखल घेतली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन पथके स्थापन करून पंधरा पोलिसांवर याची जबाबदारी दिली आहे.

जिल्ह्यात तयार होत असलेल्या बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असू शकतो. आठवडाभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी मंठा रोडवर केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष हे दोघेही मुंबईचे असून, बनावट दारू तयार करण्यापुरतेच हे या ठिकाणी थांबत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या कारवायांमध्ये ४७५ जणांवर गुन्हे नोंदवलेले आहे. त्यात ३१४ गुन्हे हे वारस १६१ बेवारस गुन्हे असून एकूण २० वाहने जप्त करण्यात आले. त्यात एक चारचाकी वाहन असून ३० लाख ३१ हजार ४२७ चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारूची विक्री राेखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल, पोलिसांची पथके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाया करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात अपुऱ्या मनुष्यबळावर राज्य उत्पादन शुल्क जालना कार्यालय कामकाज पाहत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कलम ६८ अंतर्गत धाब्यावर मद्यपींसाठी दारू पिण्याची व्यवस्था केली जात असेल तर धाबे मालकावर २५ हजार ते ५० हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. यासह तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.


दरम्यान, बनावट दारू संदर्भात कारवाया सुरू आहेत. वर्षभरात ९० जणांना ताब्यात घेतल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.

जालना शहर, उटवदजवळील ढाब्यावर कारवाई
४ डिसेंबर : रोजी जालना शहरातील एका भागातून बनावट दारू तयार करणारे दोन जण ताब्यात घेतल्यानंतर ही बनावट दारू इतर सात जणांच्या मदतीने करत असल्याचे समोर आले. या सात जणांनाही एलसीबीने ताब्यात घेतले.


११ डिसेंबर : रोजी मंठा रोडवरील उटवद जवळील एका ढाब्यात बनावट दारू तयार करणाऱ्या मुंबई येथील दोन जणांना ताब्यात घेतले. हे दोघेही बनावट दारू तयार करून देण्यात एक्स्पर्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...तर पाच हजारांचा दंड
कायद्याच्या कलम ८४ ख अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे , त्याला साथ देणाऱ्याला ५ हजारांचा दंड होऊ शकतो. तरी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परवान्या व्यतिरिक्त अन्य ढाबे व हॉटेल येथील मद्यपी व पार्ट्यांवर विशेष नजर असणार आहे. भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना.र गुन्हे नोंदवलेले आहे. त्यात ३१४ गुन्हे हे वारस १६१ बेवारस गुन्हे असून एकूण २० वाहने जप्त करण्यात आले. त्यात एक चारचाकी वाहन असून ३० लाख ३१ हजार ४२७ चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारूची विक्री राेखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल, पोलिसांची पथके यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाया करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात अपुऱ्या मनुष्यबळावर राज्य उत्पादन शुल्क जालना कार्यालय कामकाज पाहत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कलम ६८ अंतर्गत धाब्यावर मद्यपींसाठी दारू पिण्याची व्यवस्था केली जात असेल तर धाबे मालकावर २५ हजार ते ५० हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. यासह तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.


दरम्यान, बनावट दारू संदर्भात कारवाया सुरू आहेत. वर्षभरात ९० जणांना ताब्यात घेतल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.

जालना शहर, उटवदजवळील ढाब्यावर कारवाई
४ डिसेंबर : रोजी जालना शहरातील एका भागातून बनावट दारू तयार करणारे दोन जण ताब्यात घेतल्यानंतर ही बनावट दारू इतर सात जणांच्या मदतीने करत असल्याचे समोर आले. या सात जणांनाही एलसीबीने ताब्यात घेतले.


११ डिसेंबर : रोजी मंठा रोडवरील उटवद जवळील एका ढाब्यात बनावट दारू तयार करणाऱ्या मुंबई येथील दोन जणांना ताब्यात घेतले. हे दोघेही बनावट दारू तयार करून देण्यात एक्स्पर्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...तर पाच हजारांचा दंड
कायद्याच्या कलम ८४ ख अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे , त्याला साथ देणाऱ्याला ५ हजारांचा दंड होऊ शकतो. तरी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परवान्या व्यतिरिक्त अन्य ढाबे व हॉटेल येथील मद्यपी व पार्ट्यांवर विशेष नजर असणार आहे. भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना.Fake alcohol issue in jalna

Post a comment

 
Top