0

चार वर्षांपासून रोहितला डेट करतेय श्वेता, 5 महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणारी अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद 13 डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड रोहित मित्तलसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. दोघांचे पुण्यातील ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये लग्न संपन्न झाले. लग्नानंतरचे श्वेताचे काही फोटोज समोर आले असून त्यात ती ऑरेंज-गोल्डन साडीत तर रोहित नेव्ही ब्लू आणि व्हाइट शेरवानीत दिसतोय. बातम्यांनुसार, बंगाली पद्धतीनंतर आता हे दोघे मारवाडी पद्धतीने लग्न थाटणार आहेत. गेल्या 4 वर्षांपासून श्वेता आणि रोहित एकमेकांना डेट करत असून याचवर्षी जून महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.


13 डिसेंबरला लग्नापूर्वी श्वेताचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. तिचे हळदीचे फोटोही समोर आले होते, ज्यात ती तिच्या आईवडिलांसोबत दिसली. सोबतच रोहितचेही हळदीचे फोटो समोर आले होते. हे फोटो रोहितची बहीण सुरभी मित्तलने शेअर केले होते. 12 डिसेंबर रोजी श्वेताची मेंदी सेरेमनी झाली होती. या कार्यक्रमात तिने डार्क रेड कलरचा लहेंगा परिधान केला होता. लग्नानंतर आता श्वेता आणि रोहित मुंबईत रिसेप्शन देमार आहेत.


फँटम फिल्म्समध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट आहे श्वेता...
श्वेताने 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटात वरुण धवनच्या वहिनीची भूमिका वठवली होती. श्वेता बसू अनुराग कश्यपचे प्रॉडक्शन हाऊस फँटममध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट म्हणून गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. येथेच रोहितसोबत श्वेताची पहिली भेट झाली होती. श्वेताने 'मकडी', 'इकबाल', 'वाह लाइफ हो तो ऐसी' या बॉलिवूड चित्रपटांत काम केले, त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. श्वेताने चित्रपटांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतही काम केले असून 'कहानी घर-घर की', 'करिश्मा का करिश्मा' या मालिकांमध्ये ती झळकली होती.Actress Shweta Basu Prasad Tie the knot with Rohit Mittal See her wedding photos

Post a Comment

 
Top