बई - भीम आर्मीकडून दादर स्थानकाचेडॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर आंदोलन करण्यात आले. मागील २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत, रेल्वे प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र, सरकार आमच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितलं.
दरम्यान, भीम आर्मी चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अशोक कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दादर स्थानकाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी भीम आर्मीने उचलून धरली आहे. यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंदोलन केलं. 

Post a Comment