0
माढ्यातील अल्पवयीन मुलीस बेकरीत काम करणाऱ्या अशोक शुक्लने फूस लावून पळवून नेले होते.

सोलापूर - अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी न्यायालयाने तरुणास १० वर्षांची शिक्षा सुनावली. अशोक गंगासागर शुक्ल (कल्याणनगर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

माढ्यातील अल्पवयीन मुलीस बेकरीत काम करणाऱ्या अशोक शुक्लने फूस लावून पळवून नेले होते. तत्पूर्वी पीडितेच्या वडिलांनी २४ एप्रिल २०१६ राेजी माढा पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अाराेपी या मुलीस उत्तर प्रदेशात घेऊन गेला. तिथे त्याने मुलीबरोबर बळजबरीने लग्न करून दुष्कर्म केेले. हे निष्पन्न झाल्यावर अाराेपीवर लैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. अाराेपीच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून त्या तरुणास व पीडितेस उत्तर प्रदेश येथून १० मे २०१६ रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन माढा येथे आणले हाेते. दरम्यान, या प्रकरणी १५ ऑक्टोबर २०१६ रोजी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. पीडितेचे वडील,भाऊ व पीडित मुलगी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
Miner girl rape case, 10 Years in Prison to Criminal

Post a Comment

 
Top