सूरत- पांडेसराच्या हरिओम नगरमध्ये भाजप नगरसेवक डॉ. डीएम वानखेड़ेच्यांच्या साई क्लीनिकमध्ये छातीत दुखल्याने एका रूग्णाचा मृत्यु झाला. त्यावेळेस क्लिनीकमध्ये डॉक्टर नव्हते. त्यामुळे एका नर्सने त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच रक्ताच्या उल्ट्या करत रूग्ण बाहेर पाळाला आणि जमिनीवर कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर नातेवाईकांनी क्लिनीकमध्ये खुप गोंधळ केला, त्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले.
डॉक्टरांना दिला चोप
मध्यस्थी करायला आलेल्या एका डॉक्टरला लोकांनी चांगलाच चोप दिला. इतकेच नाही तर प्रकरण दाबण्यासाठी डॉ. वानखेडेने 108 अँबुलंसला बोलवले आणि रूग्णाला त्यात टाकले. पण त्याला पाहताय अँबुलंसवाल्या लोकांनी सांगितले की, त्याचा मृत्यु झाला आहे, तरीदेखील डॉक्टरने जिवंत आहे असे सांगुन त्यात टाकले. पण अँबूलंसवाल्या लोकांना कळाले होती की, तो मेलेला आहे त्यामुळे त्यांनी मृत रूग्णाला नेण्यास नकार दिला आणि ते निघून गेले. अंदाजे 4 तास परिसरात गोंधळ सुरूच होता. पोलिसांनी लोकांना हकलण्यासाठी लाठीचार्ज केला. शवविच्छेदनात स्पष्ट झाले कि, रूग्णाचा मृत्यु हर्ट अटॅकमुळे झाला आहे. यात पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केलेली नाहीये.
नर्सने डायक्लोफेनिक इंजेक्शन देऊन चुक नाही केली
नर्स नवीन नव्हती. तिच्याकडे डिग्री आहे, आणि ती 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. तिने रूग्णाला डायक्लोफेनिक इंजेक्शन देऊन कोणतीच चुक केली नाहीये. अँबुलेंस बोलवली होती, त्याला मोठ्या रूग्णालयात नेले असते तर तो वाचला आसता.
-डॉ. डीएम वानखेड़े, साई क्लीनिक.
स्ट्रोकपण होऊ शकतो हार्ट पेशेंटला डायक्लोफेनिकमुळे
जगभरातील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, पेन किलस डायक्लोफेनिक कंटेटच्या औषधे किंवा इंजेक्शन हार्ट आणि किडनीच्या रूग्णांसाठी सुरक्षित नाहीये. यामुळे हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोक सारख्या रिअॅक्शन्स होऊ शकतात. अनेक दिवस हे औषध घेतल्यामुळे जीवाला धोका असतो, आणि याची फक्त 100 mg मात्रा शरीरासाठी चांगली आहे.
हार्ट अटॅकमुळे झालेल्या मृत्यु, एफएसएलने कळेल
मृतदेहाचे सिवील हॉस्पीटलमध्ये फॉरेंसिक पोस्टमार्टम केले गेले. त्यात कळाले की, मृत्यु हार्ट अॅटॅकमुळे झाला आहे. आता हार्ट अटॅक इंजेक्शनमुळे झाला की, दुसऱ्या कारणांमुळे झाला ते एफएसएलच्या रिपोर्टमध्ये कळेल. यात स्पष्ट कळेल की, मृत्यु औषधांच्या रिअॅक्शनमुळे झाला आहे का इतर काही कारण आहेत.
एफएसएलने कळेल - किडनी, लीवर, लंग्स आणि ब्लडमध्ये इंजेक्शनचा काय प्रभाव पडला आहे.
- डॉ. वानखेड़ेने त्यांचे भाजप संपर्क कार्यालयालाय क्लीनिक बनवले आहे.
- इंजेक्शनमुळे काय अॅलर्जी झाली.
- हार्टवर इंजेक्शनचा काय प्रभाव पडला आहे.
- इंजेक्शनमुळे अटॅक आला का आधीच येऊन गेला.

Post a Comment