राज म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत.
नाशिक- वातावरण बदलतेयच, बघता ना, पेपरमधील फाेटाे बघितले का, सत्तेत असलेल्यांची जाण्याची वेळ आली. भविष्यकाळ आपलाच आहे. आता तयारीसाठी लागा व पक्षहितासाठी थेट माझ्यापर्यंत काेणतीही सूचना व तक्रार करण्यासाठी दरवाजे खुले आहे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची उमेद जागवली.
राज म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात देखील मी सुरू केली आहेत. महानगरपालिका, विधानसभेपासून ते लोकसभा निवडणुकांपर्यंत सर्व निवडणुकांची तयारी सुरू आहे. तुम्हाला जे काय मार्गदर्शन लागेल ते मी करेन. प्रत्येकाला बोलवले जाईल. त्याठिकाणी तुमच्या समस्या ऐकल्या जातील. माझ्याकडे आपणास काही गोष्टी सांगायची असेल तर आपण मला एक बंद लिफाफ्यांमध्ये आपला नाव, पदासह लेखी स्वरुपात राहुल ढिकले किंवा अशोक मुर्तडक यांच्याकडे द्याव्यात. होर्डिंगवर माझा फोटो टाकलेला नाही, नाव छोटे टाकले जाते किंवा माझे नाव बोल्ड नसते, अशा स्वरुपाच्या तक्रारी करू नये, असे ठाकरेंनी सांगितले.
अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगी चरणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा बालपणीची मैत्रीण मिताली बाेरुडे हिच्याशी २७ जानेवारीला लाेअर परेल येथे विवाह हाेणार आहे. शुक्रवारी राज यांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेत देवीला पत्रिकाही अर्पण केली. त्यांनी विधिवत पूजन करून नवीन वर्षाचा संकल्पही साेडला.

Post a Comment