0
पर्थची खेळपट्टी पाहून भारताचा कर्णधार विराट कोहली जाम खुष झाला आहे. उद्यापासून (ता.१४)ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. याचदरम्यान विराट कोहलीने पर्थचे मैदान पाहून खुष  असल्याचे सांगितले आहे. विराट खेळपट्टीवरील गवत न हटण्याची आशा व्यक्त करत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगलीच मदत होणार आहे.

एका क्रीडा वेबसाईटला  दिलेल्या मुलखतीमध्ये विराट बोलत होता. तो म्हणाला, की मैदानावरील गवत संघाच्या जलद गोलंदाजांसाठी फायद्याचे आहे. मी त्या खेळपट्टीची पाहणी केली . ॲडलेड खेळपट्टीच्या तुलनेत  पर्थच्या खेळपट्टीवर अधिक गवत असल्याने संघासाठी फायद्याचे आहे. विजयाचे ध्येय नजरेसमोर ठेवुनच मैदानात उतराणार आहोत. 

कोहलीच्या मते जर गोलंदाज स्वतःची भुमिका नीट बजावु  शकत नसतील तर  अधिक धावसंख्या काढणे फायद्याचे नाही. या दोन्ही सत्रामध्ये वीस पैकी वीस बळी घेणे गरजेचे आहे. तसेच तो पुढे म्हणाला, कोणत्याही कसोटी सामन्यात विजय मिळवणे शक्य आहे, पण त्यासाठी वीस बळी घेतल्या पाहिजेत. सामन्यात तुम्ही किती धावा काढता हे गरजेचे नाही. गोलंदाजांचे प्रदर्शन चांगले हवे. मी खुष आहे कारण माझ्या संघात चांगले गोलंदाज आहेत जे वीस बळी घेण्यासाठी सक्षम आहेत. 

भारताने ऑस्ट्रेलियातील चार कसोटी मालिकेत ॲडलेड येथील पहिली कसोटी जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला. भारताचा हा ऐतिहासिक विजय ठरला.

Post a comment

 
Top