0

भाजपचे नेते कोणत्याही कारणावरून राज्यपालांची भेट घेऊ इच्छित असतील तर अाम्हाला काही वावगे वाटणार नाही : सिद्धरामय्या

हुबळी- राज्यात भारतीय जनता पक्ष मागील दाराने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत अाहे. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी हाेणार नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले. सिद्धरामय्या बागलकाेट जिल्ह्यातील एका कार्यक्रमास जाण्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी बाेलत हाेते. कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार अाणि खातेवाटपासंदर्भात काेणताही वाद नाही. काही मंत्र्यांनी महत्त्वाच्या विभागांची मागणी केली असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे प्रभारी के. सी. वेणुगाेपाल यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात पक्षातील नेत्यांशी दाेन दिवस चर्चा केली. अाता लवकरच मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जाईल. कर्नाटकातील जनता दल (एस) व काँग्रेसचे सरकार मजबूत व सुरक्षित अाहे.

भाजपचे नेते कोणत्याही कारणावरून राज्यपालांची भेट घेऊ इच्छित असतील तर अाम्हाला काही वावगे वाटणार नाही. दाेन्ही पक्षांतील युती येत्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. दरम्यान, अाठ मंत्र्यांच्या खातेवाटपावरून कर्नाटकात वाद सुरू अाहे. त्यासंदर्भात नेत्यांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी वेणुगाेपाल अाले हाेते. दाेन दिवस त्यांनी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी ते दिल्लीला रवाना झाले. अाता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण साेडवले जाणार अाहे.News about Siddaramaiah's Statement

Post a Comment

 
Top