0
टेबल टेनिसमध्ये मानाचा असलेला ब्रेकथ्रू टेबल टेनिस अवॉर्ड मिळवत तिने टेबल टेनिसमधील सरस कामगिरी केली आहे.

स्पोर्ट्स डेस्क - सायना, सिंधू, सानिया, मेरी कोम, साक्षी या भारतीय स्पोर्टस् स्टार गेल्या काही दिवसांत चर्चेत राहिल्या आहे. अशीच आणखी एक स्पोर्ट्स स्टारमध्ये मणिका बत्रा. टेबल टेनिसमध्ये मानाचा असलेला ब्रेकथ्रू टेबल टेनिस अवॉर्ड मिळवत तिने टेबल टेनिसमधील सरस कामगिरी केली आहे. कारण हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला टेबल टेनिसपटू आहे. इंचियॉन येथे एका सोहळ्यात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2018 करिअरसाठी खास
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मणिका म्हणाली की, हा पुरस्कार मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे. 2018 हे वर्ष माझ्यासाठी आतापर्यंत अगदी खास ठरले आहे. मी जे काही मिळवले त्यात आनंदी आहे.


राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी कामगिरी
>> मणिकाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने गतविजेत्या सिंगापूरचा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्तेतील सांघिक गटातील पहिले सुवर्ण पटकावले.
>> मणिकाने महिला एकेरीमध्येही सुवर्णकामगिरी केली.
>> महिला दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्य पदक पटकावत स्पर्धेत चार पदके पटकावण्याचा विक्रम केला.
>> 2018 च्या एशियन गेम्समध्येही मणिकाने मिश्र दुहेरीत कास्य पदकाची कमाई केली.
>> 2018 मध्ये मणिकाने करिअरमधील सर्वोत्कृष्ट 52 वे रँकिंग मिळवले. भारतासाठी महिला टेबल टेनिसपटूचे हे सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे.Manika Batra got rare award in table tennis first to indian

Post a Comment

 
Top