0

विवेकानंद यांच्या 10 अशा गोष्टी, यामुळे आपल्या सर्व अडचणी होऊ शकतात दूर

रिलिजन डेस्क : रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद विश्व प्रसिद्ध अध्यात्मिक गूरु होते. 1893 मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथे पार पडलेल्या विश्व धर्म महासभेत त्यांना भाषण दिले होते. या भाषणामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. आजही ते भाषण पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. रामकृष्ण परमहंस मिशनची सुरुवात देखील विवेकानंद यांनी केली होती. स्वामी विवेकानंद यांचे असे काही विचार ज्यावर आपण लक्ष केंद्रीत केल्यास यश संपादित करू शकता.


1. एखाद्यावेळी एखादे काम करण्याचे ठरविले असल्यास त्यावेळी ते काम करावे, अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होईल.

2. आपण तेच आहोत ज्याचा आपण विचार करतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी असू द्या की आपण काय विचार करता. आपण जसा विचार करता तसेच बनता.

3. आपण जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत देवावर विश्वास ठेवू शकत नाही.

4. सत्य हजारो मार्गांनी सांगितले जाते पण तरीही सत्य हे एकच असणार.

5. ज्यादिवशी आपल्यासमोर एखादी अडचण आली नाही तर आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत.

6. जितके आपण बाहेर जाऊ आणि इतरांचे चांगले करू, आपले हृदय तितकेच शुद्ध होईल आणि परमात्मा त्यात निवास करतील.

7. आपण देवाला शोधायाला बाहेर का जातो? आपण त्याला आपल्या हृदयामध्ये आणि प्रत्येक जिवंत प्राण्यामध्ये नाही पाहू शकत?

8. तुम्हाला आतूनच बाहेर विकसीत व्हायचे आहे. तुम्हाला ते कोणी शिकवणार नाही. तुम्हाला कोणीच आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या आत्माशिवाय तुमचा कोणीही गुरू नाही.

9. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरूवातील विनोद बनतो. त्याचा विरोध होतो आणि एक दिवस त्याच गोष्टीचा स्वीकार करण्यात येतो.

10. कोणत्याही गोष्टीचे भय बाळगू नका. तुम्ही अद्भुत कार्य करू शकता. हीच निर्भयता तुम्हाला परमआनंद देते.

Post a comment

 
Top