0
मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथील २९ वर्षीय युवा शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वजीरखेडे येथील निलेश धर्माजी ह्याळीज या युवा शेतकर्‍याने नापिक जमीन व कर्जाला कंटाळून सकाळी विहिरीत गळफास घेत आत्महत्या केली. निलेश हा अविवाहित असून त्याच्यावर आई व चार बहिणींची जबाबदारी हाोती. या शेत जमिनीवर मालेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे चार लाख रुपयांचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. यापूर्वीच त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे.

Post a comment

 
Top