0
सातारा जिह्यात माध्यमिक विभागाच्या विविध संस्थांच्या 708 शाळा आहेत. या शाळेमध्येच दहावीचेही वर्ग असून त्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासूनच नवीन विषय अभ्यासक्रमात घेतला आहे. तो म्हणजे संरक्षण शास्त्र. या विषयाची पुस्तके एक सत्र संपत आले तरीही विद्यार्थ्यांकडे अजूनही उपलब्ध नाहीत. ही सातारा शहरातील एका शाळेत घडलेली बाब असून त्या शाळेच्या संबंधित विषयाच्या शिक्षकाने सोमवारी कसल्याही परिस्थिती पुस्तके आणण्याचे फर्मान काढले असून हे पुस्तक बाजारात मिळत नाही. कृत्रिम टंचाई केल्याने पालकांनी पुस्तकासाठी धुंढाळली आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे ढिसाळ काम समोर आले असून आता सातारा शहरातील शाळांत ही अवस्था तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये कशी असेल अशी चर्चा सुरु आहे.
दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे वर्ष समजले जाते. याच वर्षात दहवीकरता शासनाने संरक्षण शास्त्र हा विषय अभ्यासक्रमांत आणला आहे. त्या विषयाचे पुस्तक वास्तविक माध्यमिक शिक्षण विभागानेच शाळा सुरु होण्यापूर्वी उपलब्ध करुन देण्याची गरज असते. परंतु दिवाळीची सुट्टी संपली अन् शाळा सुरु झाल्या. केवळ एकच आठवडा शाळा सुरु होवून झाला नसेल तोच साताऱयातील एका चांगल्या शाळेतील एका तुकडीमधील सर्वच विद्यार्थ्यांकडे संरक्षणशास्त्राचे पुस्तक नसल्याने त्या विद्यार्थ्यांना सोमवारी कसल्याही परिस्थिती सोमवारी शाळेत येताना हे पुस्तक घेवून या असे फर्मान सोडले. त्या शाळेत क तुकडीला जे शिक्षक आहेत. त्यांनी मात्र आपल्या विद्यार्थ्यांची पुस्तके कोल्हापूरवरुन आणली. सातारा शहरात जर दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमीत पुस्तक मिळत नसेल तर पालकांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ते पुस्तक बाजारात कुठे मिळते का म्हणून साताऱयातील बलटेशवार बुक डेपो, श्रीराम बुक डेपो यासह सर्व पुस्तकांची दुकाने तपासली. परंतु पुस्तक मिळाले नाही. याबाबत दुसऱया शाळेतील एका शिक्षकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या विषयाची पुस्तके संघटना तयार करते. त्या संघटनेकडून पुस्तके येतात. या पुस्तकांची टंचाई आहे.माझ्याकडे पुस्तके आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकाऱयांचा फोन स्वीच ऑफ
सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्याकडे दोन पदभार आहेत. ते सुट्टीच्या दिवशीही टाचून काम करतात, असे दाखवतात. परंतु प्रत्यक्षात कामाचे तीनतेराच अनेकदा वाजल्याचे दबक्या आवाजात चर्चा रंगते.माध्यमिक विभागाकडून दहावीच्या शाळांना शिक्षण विभागाकडून पुस्तके पोहचली की नाही, त्याबाबत मात्र, पुस्तके का मिळाली नाहीत, त्याबाबत संपर्क साधला असता शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांचा मात्र फोन स्वीच ऑफ लागला.

Post a Comment

 
Top