0
बंजारा समाजाला ज्या अडचणी भेडसावत आहेत त्या सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. वाशिममध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला बंजारा भाषेत संवाद साधत बंजारा समाजाची मने जिंकली.

सेवालाल महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी वाशिममध्ये केली. सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी उर्वरित 100 कोटींची तरतूदही लवकरच करण्यात येईल असंही त्यांनी भाषणात सांगितले. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी बंजारा अकादमीची घोषणा केली. तसेच वर्धा आणि यवतमाळ या दरम्यान पोहरागड स्टेशन उभारले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बंजारा भाषा टिकण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत. ब्रिटिशांविरोधत सेवालाल महराजांनी पहिला एल्गार पुकारला त्यामुळे सेवालाल महाराज यांचे योगदान खूप मोठं आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच बंजारा समाजाने तयार केलेल्या वस्तू जगभरात पोहचाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बंजारा समाजाच्या पाठिशी हे सरकार ठामपणे उभे आहे असे आश्वासन बंजारा समाजाच्या महान जनसागरापुढे मी देतो असेही असेही मुख्यमंर्त्यांनी स्पष्ट केले. बंजारा समाजाचा विकास हे आमच्या सरकारपुढचे उद्दीष्ट आहे. आम्ही त्यात मागे हटणार नाही.
 

Post a Comment

 
Top