0
नागपूर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल वा लॉनमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. तसेच रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, घाण करणे, लघवी करणे, उघड्यावर शौच करणे वा थुंकणाऱ्यांवर १७ डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात स्वच्छता अभियानाचे पथक नागपूर शहराच्या सर्वेक्षणासाठी येणार आहे. तत्पूर्वी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती सुरू आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणांवर लघवी करणे, थुंकणे वा उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे. यासाठी झोन स्तरावर प्रत्येकी तीन पथके गठित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात कचऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याचा विचार करता घनकचरा नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक
घनकचरा व्यवस्था अधिनियम-२०१६ अन्वये सर्व घराघरातून संकलित केला जाणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरिकांनी घरात जमा होणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीला द्यावा. विलगीकरण न केल्यास १७ डिसेंबरनंतर सफाई कर्मचारी कचरा स्वीकारणार नाही. तसेच मोठ्या हॉटेल्सनी कचरा विलगीकरण करून ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावायची आहे.शहरात अशी ४० ते ४५ हॉटेल्स आहेत. हॉटेलमधील फक्त सुका कचरा सफाई कर्मचारी सं
Do dirt will pay penalty: Implementation in Nagpur from 17th December | घाण कराल तर दंड भरा : नागपुरात १७ डिसेंबरपासून अंमलबजावणीकलित करणार आहेत. याबाबत वृत्तपत्रातून जाहिराती देण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment

 
Top