0
लग्नाच्या दीड महिन्यानंतरच येत असलेल्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर दीपिकाने सोडले मौन

 • मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आपल्या लग्नानंतर आता दूस-यांचे लग्न अटेंड करण्यात व्यस्त आहेत. प्रियांका चोप्रा आणि कपिल शर्मासोबतच ते दोघं आता एका जवळच्या मित्राच्या लग्नामध्ये पोहोचले. दीपवीरचे काही वेडिंग फोटोज आणि व्हिडिओजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघंही 28 डिसेंबरला मुंबईच्या हॉटेल 'द ताज महल' मध्ये फ्रेंडचे लग्न अटेंड करण्यासाठी पोहोचले होते. लग्नामध्ये नववधूसोबत दीपिका आणि रणवीरने खुप डान्स केला. दीपवीरला पाहताच नातेवाईकांनीही त्यांना घेरले आणि त्यांच्यासोबत ठुमके लावले. यादरम्यान दीपिकाने व्हाइट साडी नेसली होती तर रणवीरने थ्रीपीस सूट घातला होता.

  दीपिकाच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर...
  - नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका प्रेग्नेंसीविषयी बोलली. दीपिका म्हणाली, "मला काही टॅकल करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. तुम्ही एक पब्लिक फिगर आहात तर तुम्हाला अनेक प्रकारच्या अफवांची सवय होऊन जाते."
  - दीपिका म्हणते की, अनेक वेळा लोक पहिले अंदाज लावतात. हे अनेक वेळा खरेही ठरतात. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ही गोष्ट खुप कॉमन आहे. हे जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. लग्नानंतर महिलांवर आई होण्याची अपेक्षा वाढते.
  दीपवीरचे वर्कफ्रंट 
  - लग्नानंतर रणवीर सिंहचा पहिला चित्रपट 'सिम्बा' रिलीज झाला आहे. रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात तो सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानसोबत दिसतोय. 
  - चित्रपटात एसीपी संग्राम भालेरावची भूमिका तो सारातोय. त्याचा हा अवतार प्रेक्षक आणि ट्रेड एनालिस्ट्सला आवडला आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बालानुसार, भारतात या चित्रपटाने पहिल्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. 
  - तर दीपिकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, 2018 मध्ये दीपिकाने 'पद्मावत' हा शानदार चित्रपट दिला आहे. तिचा पुढचा प्रोजेक्ट 'छपाक' हा आहे. मेघना गुलजार याचे डायरेक्शन करत आहे. हा चित्रपट अॅसिड अटॅकला बळी पडलेल्या लक्ष्मी अग्रवालवर आधारित आहे. 

Post a Comment

 
Top