0
 • नागपूर- देशभरात नव्याने दिल्या जाणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्सवर (अनुज्ञप्ती) आता अवयवदानाच्या प्रतिज्ञेची माहिती मिळणार आहे. तसेच इच्छुक व्यक्तीच्या अनुज्ञप्तीवर ‘अवयवदाता’असा उल्लेख करण्यात येणार अाहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ‘माय मेडिकल मंत्रा’ या आरोग्यविषयक बातम्या देणाऱ्या वेब पोर्टलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी अवयवदात्या कुटुंबीयांचा सत्कार केला. तसेच अवयवदानाच्या प्रसारासाठी चालवण्यात येणाऱ्या या मोहिमेचे कौतुक केले. अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कारही केला.
  गडकरी म्हणाले, ‘अवयवदानाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबीयांचं मी अभिनंदन करतो आणि एका व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. इतर व्यक्तींचे अवयव घेतल्याने त्यांची स्मृती जतन केली, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. अवयवदानाबाबत ड्रायव्हिंग लायसन्सवर माहिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे एखाद्या व्यक्तीची अवयवदानाबाबत स्वीकृती नातेवाइकांनादेखील कळण्यास मदत हाेईल.’ मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलच्या किडनीविकार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्छू म्हणाले, माय मेडिकल मंत्राने अवयवदानाबाबत मोहीम सुरू केली अाहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत होईल. दात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केल्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळेल. नागपूर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, अवयव प्रत्यारोपण समन्वयक वीणा वाठोरे, डॉ. हेमंत भालेवर, डॉ. श्रृषी अंधाळकर याप्रसंगी उपस्थित होते.
  अपघातप्रवण ठिकाणी हेलिपॅड बांधणार 
  टाटा ट्रस्ट आणि जर्मनीतील कंपनीच्या मदतीने महामार्गावर ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात तिथे हेलिपॅड बांधण्यात येतील. अपघातग्रस्तांना त्वरेने वैद्यकीय मदत मिळू शकेल. अवयवदानाबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होतेय. ही जनजागृती वाढली की मोठ्या संख्येने लोकांचे जीव वाचवता येतील, असेही गडकरी म्हणाले.
  नागपुरात ५ वर्षांत ४१ जणांचे अवयवदान
  नागपूर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी या वेळी म्हणाल्या, देशभरात अवयवदान करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. त्याबाबत अाता जनजागृती हाेतेय. पाच वर्षांत नागपूरमध्ये ४१ लोकांनी अवयवदान केले आहे. 

  अवयव दान करणाऱ्यांचे केले कौतुक

  • The pledge of organ of donation is on 'Driving License- Nitin Gadkari'

Post a comment

 
Top