0
14 डिसेंबर रोजी ईशा आणि आनंद यांचे रिसेप्शन मुंबईतील जियो गार्डनमध्ये झाले.

मुंबई: मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी 12 डिसेंबर रोजी उद्योगपती आनंद पीरमलसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर 14 डिसेंबर रोजी अंबानी कुटुंबीयांनी ईशा आणि आनंद यांचे रिसेप्शन मुंबईतील जियो गार्डनमध्ये आयोजित केले होते. यावेळी ईशा आणि आनंदसोबत मुकेश अंबानी, नीता अंबानी, अजय पीरामल आणि स्वाती पीरमल फॉर्मल ड्रेसमध्ये दिसले. रिसेप्शनमध्ये ऑस्कर विजेते संगीतकार-गायक ए. आर. रहमान आणि तबला वादक उस्ताद झाकिर हुसैन यांनी सादरीकरण केले.

दिग्गजांची उपस्थिती...

- तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम आणि पुड्डुचेरीच्या गव्हर्नल किरण बेदी रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
- अभिनेता जितेंद्र, त्यांची मुलगी एकता आणि मुलगा तुषारसोबत रिसेप्शनमध्ये पोहोचले.
- अभिनेता बोमन ईराणी त्यांच्या पत्नी जेनोबिया ईराणीसोबत तर अदनान सामी पत्नी रोया सामी आणि मुलगी मेदीना सामीसोबत दिसले.
- अभिनेत्री हेमामालिनीची मुलगी ईशा पती भरत तख्तानीसोबत पोहचली होती. गायिका फाल्गुनी पाठक, अभिनेता सनी देओल, रितेश देशमुख हे सेलेब्सही यावेळी दिसले.
- दीया मिर्झा, साहिल संघा, जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे, सुभाष घई, कार्तिक आर्यन, नील नितिन मुकेश आणि क्रिकेटर क्रुणाल पांड्या , त्याची पत्नी पंखुडी हेही रिसेप्शनमध्ये दिसले.
- नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनीही नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

अँटीलियामध्ये झाले होते लग्न...
मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटीलिया येथे ईशा आणि आनंद यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. ईशा आणि आनंद यांना आशीर्वाद देण्यासाठी अमेरिकेच्या माजी राष्ट्रपीत बिल क्लिंटनच्या पत्नी हिलेरी क्लिंटन, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, अभिनेता अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि आमिर खान यांनी उपस्थिती लावली होती.

रिलायन्स रिटेल वेंचर सांभाळते ईशा
ईशा अंबानी (27) रिलायन्स जियोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक आहे. ती रिलायन्स वेंचर सांभाळते. ईशाने येल युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले आहे.


पीरामल रिअॅलिटीचा फाऊंडर आहे आनंद
आनंदचे कुटुंब देशातील सर्वात मोठी फार्मास्यूटिकल कंपनी पीरामल ग्रुप चालवतो. आनंद हा पीरामल रिअॅलिटीचा फाउंडर आणि ग्रुपचा एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. आनंदने पेंसिल्वेनिया युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समध्ये डिग्री घेतली आहेत. सोबत त्याने हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले. ईशा आणि आनंद यांचा याचवर्षी सप्टेंबर महिन्यात इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा झाला होता.

Post a Comment

 
Top