0
6 महिन्यांपूर्वी नवऱ्यापासून झाली होती विभक्त...

नवी दिल्ली- दिल्लीच्या नफसगढमध्ये एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका नराधमाने महिलेलेकडून हवे ते काम करून घेण्यासाठी तिच्या मुलाला बंदी बनवले होते. कशीबशी आरोपीच्या जाळ्यातून महिलेने पळ काढला आणि थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबातची तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सूरू केला आहे.

- 6 महिन्यांपूर्वी नवऱ्यापासून विभक्त झालेली रानी(बदललेले नाव) ला आपल्या 3 वर्षांच्या मुलाच्या संगोपनासाठी कामाची गरज होती. त्या दरम्यान ती जितेंद्र नावाच्या युवकाच्या संपर्कात आली. त्याने तिला पार्ट्यांमध्ये वेट्रेसचे काम देण्याचे वचन दिले, आणि त्यासोबतच तिला आपल्या घरी राहायला जागा दिली. पण काही दिवसानंतर पार्ट्यांमध्ये काम देण्याऐवजी तो तिला पार्टीत नाचायला बळजबरी करू लागला. तिने या गोष्टीचा विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली आणि तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली. ती पळून जाऊ नये म्हणून त्याने तिच्या मुलाला बंदी बनवले.

- कशीबशी त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून तिने थेट तिच्या एका नातेवाईकाच्या घरी गेली. जितेंद्रने पाठलाग करत तिला गाठले. नंतर तिला आणि तिच्या नातेवाईकाला जीवे मारण्यीची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी फरार झाला.

- काही दिवसांनंतर त्याने परत तिला संपर्क करून तुझे सामान राहिले आहे ते घेऊन जा असे सांगून तिला बोलवले. ते घेण्यासाठी ती गेली असता त्याने बळजबरीने तिला गाडीत बसवून तिला घेऊन गेला आणि 6 महिन्यांपर्यंत तिच्याकडून हवे ते काम करून घेतले त्यानंतर महिलेने परत त्याच्या तावडितून स्वत:ची सुटका करून नफसगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.Man kidnapped boy to make his mother dance in parties

Post a comment

 
Top