0
नववर्षाच्या सुरूवातीलाच पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. नौगाम विभागातील नियंत्रण रेषेवर लष्कराने ही कारवाई केली. यादरम्यान पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT)च्या दोन घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार मारले. तसेच या घुसखोरांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी BAT ची पथके मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन नियंत्रण रेषेजवळील जंगलात येत होती. त्यांच्या मदतीसाठी यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत होता. मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हा हल्ला परतवून लावला. तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर या घुसखोरांकडून शस्त्रास्त्रे  आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. 
ठार मारण्यात आलेल्या घुसखोरांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सामान होते. तसेच शस्त्रास्त्रेही होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सामान पाहता ते भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या इराद्याने आले होते, हे स्पष्ट होते, असे लष्कराकडून सांगण्यात आले. 

Post a Comment

 
Top