0
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन 13 वर्षाच्या शाळकरी मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून बलात्कार करणाऱया महादेव बाळू कसाळे (वय 53 रा. अत्याळ) याला भादवि 376, 504, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (फास्को) या गुन्हय़ाखाली 20 वर्ष सक्तमजूरी आणि 30 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातील 25 हजार रू. सदर पीडित मुलीला देण्याचे आदेश झाले आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश, विशेष न्यायाधिश अनिरूध्द प्रतिनिधी यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. एस. ए. तेली यांनी काम पा†िहले.
पीडित मुलगी आणि महादेव कसाळे हा एकाच गल्लीत रहावयास होते. मुलीचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी रहातात. तर आई आणि आजी मोलमजुरीसाठी इतरांच्या शेतात जातात. याचा फायदा उठवत महादेव कसाळे याने मे 2014 महिन्यात सदर मुलीस घरी बोलावून बलात्कार केला होता. मात्र मुलीला तंबी दिल्याने भितीमुळे तीने हा प्रकार घरी सांगितला नव्हता. सदर मुलीच्या आईने आणि आजीने कसाळे याला घरात बोलावून सुनावलेही होते. तरीही त्याचा प्रकार चालूच होता. शनिवारी 27 डिसेंबर 2014 रोजी सासू आणि सून या दोघी बाहेर गेल्याची संधी साधून सदर मुलीस आपल्या घरी बोलावून महादेव याने ओढणीने मुलीचे हात कॉटला बांधून दुसऱयांदा बलात्कार केला. ही घटना या पीडित मुलीने आईला कथन केली. सदर मुलीच्या आईने नवऱयाला बोलावून घेऊन घडला प्रकार सांगितल्यावर गडहिंग्लज पोलिसात रितसर नोंद करण्यात आला. महादेव कसाळे याच्या विरोधात विविधा कलमांखाली गुन्हा नोंद झाला होता. बाललैंगिक अत्याचाराचाही गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके यांनी याचा तपास करून न्यायालयात कसाळे विरोधात गुन्हा दाखल केला होता. सुनावणीच्या वेळी 7 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षिदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय़ धरून ही शिक्षा ठोठावण्यात आली. या निकालाकडे गडहिंग्लजकरांचे लक्ष लागले होते.

Post a Comment

 
Top