0
साराने सांगितले गुपित, घरच्यांचा लग्नाला होता विरोध

जयपुर- राजस्थानमध्ये नवीन उपमुख्यमंत्री काँग्रेसचे सचिन पायलट असतील. दोन दिवस चाललेल्या या ड्राम्यानंतर त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री पदावर झाली. सचिन पायलट यांचे लग्न आणि राजकारणात येण्याचा प्रवास खुप रंजक आहे. सचिन यांनी 26 व्या वर्षी पहिली निवडणुक लढवली होती त्यात त्यांनी मोठे यश मिळवले होते. लग्नाआधी त्यांना राजकारणात येण्याच विचार केला नव्हता. जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही किस्से....

सारा यांनी केला लव्ह स्टोरीचा खुलासा

- सारा आणि सचिन यांनी लग्नाचा काही दिवसानंतर एका टीवी शोला इंटरव्ह्यू दिला होता.
- सारा यांनी सांगितले की, सचिन आणि माझ्या कुटुंबामध्ये मैत्री होती त्यामुळे सचिनसोबत

माझी लहानपणापासून मैत्री होती.
- लंडनमध्ये एका फॅमिली फन्शनमध्ये या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्याच्या काही दिवसानंतर सचिन शिक्षण पूर्ण करून भारतात आला होता.
- आम्ही फोन, मेसेज, ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होतो, त्यानंतर आम्ही लग्न करायचे ठरवले.
- सचिन यांनी त्या शो दरम्यान सांगितले की, मी नशीबावर विश्वास ठेवतो आणि मला खात्री होती की आमचे लग्न होईल.

साराच्या कुटुंबीयांचा होता विरोध

- लग्नासाठी सचिन यांनी आपल्या घरच्यांचा होकार मिळवला पण साराच्या घरच्यांचा विरोध होता.
- सारा यांना वाटले नव्हते की, त्यांच्या कुटुंबींयाकडून विरोध होईल कारण तिच्या वडिलांनी ख्रिश्चन महिलेशी लग्न केले होते आहे भावाने शिख महिलेशी.

2004 मध्ये झाले लग्न

- 15 जानेवारी 2004 ला सचिन आणि सारा यांचे लग्न दिल्लीच्या कनिंग लेनमध्ये झाले.
- लग्नाच्या वेळेस साराचे वडील डॉ. फारुख अब्दुल्ला लंडनमध्ये होते आणि त्यांचे भाऊ उमर अब्दुल्ला अपेंडिसाइट्सच्या उपचारासाठी दिल्लीच्या एका रुग्णलयात भर्ती होते.

संपून गेला कुटुंबातला दुरावा

- आता लग्नाच्या 14 वर्षांनंतर सारा आणि सचिन यांना दोन मुले आरान आणि विहान आहेत.
- अब्दुल्ला आणि पायलट कुटुंबांचा दुरावा आता संपला आहे आणि अनेकवेळा त्यांना एकाच मंचावर पाहिले गेले आहे.

लग्नाच्या वेळेस एमएनसीत नोकरी करायचे सचिन

- जेव्हा सचिन आणि साराचे लग्न झाले तेव्हा ते एका एमएनसीत नोकरी करायचे.
- काही दिवसांनंतर वडील राजेश पायलट यांचे निधन झाले त्यामुळे त्यांना राजकारणात यावे लागले.
- त्यांनी आपल्या सौदा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती आणि मोठ्या फरकाने जिंकुन खासदार झाले होते.

समाजसेवी आहेत सारा पायलट

- 2018 च्या निवडणुकीच्या वेळेस सचिन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांना एग्रीकल्चरिस्ट आणि पत्नी सारा यांना समाजसेवीका सांगितले आहे.
- एडीआरच्या रिपोर्टनुसार सारा यांचे वार्षीक उत्पन्न 14 लाख रूपये आहे तर सचिन यांचे 9 लाख आहे.
Sachin and sara pilot love story

Post a Comment

 
Top