चॉकलेट हिरो' देव आनंद अभियाबरोबरच आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिध्द होते. २६ सप्टेंबर, १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. देव आनंद या जगात नसले तरी त्यांचा अभिनय, आठवण अजूनही जीवंत आहे. त्यांचे डायलॉग्स आजदेखील लक्षात राहणारे आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांच्याबद्दलच्या या खास गोष्टी.
- १९४६ मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून सिनेजगतात पाऊल ठेवणारे देवसाहब यांनी आपल्या ६० वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये जवळपास शंभरहून अधिक चित्रपट केले.
- त्याचबरोबर, देव साहब यांनी नवकेतन फिल्म्सच्या बॅनर खाली ३५ चित्रपटांची निर्मिती केली आणि १९ चित्रपटांचे दिग्दर्शन ही केले.
- ते एक असे अभिनेते होते, ज्यांनी अनेक अभिनेत्रींच्या करिअरची नौका बॉलिवूडमध्ये पार केली.
- देव आनंद यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये टॅक्सी ड्राईवर, मुनीम जी, फंटूश, इंसानियत, सी.आई.डी , नौ दो ग्यारह, जिद्दी, निराला, विद्या, अफसर, जाल, सोंलवा साल, काला पानी, काला बाजार, बम्बई का बाबू, माया, जब प्यार किसी से होता है, हम दोनों, बात एक रात की, असली नकली, तेरे घर के सामने, शराबी, तीन देवियां, ज्वेल थीफ, गाईड, प्रेम पुजारी, हरे राम हरे कृष्ण, जानी मेरा नाम, तेरे मेरे सपने यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
- देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिरोशीमल आनंद असं होतं. त्यांचे वडील पिशोरीमल आनंद वकील होते. देव आनंद यांचं नाव त्यांच्या आई-वडिलांनी 'चीरू' असं ठेवलं होतं. 

Post a Comment