0
अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांच्या शोध मोहिमेदरम्यान चकमकीत ६ अतिरेक्यांना ठार करण्यात आले. सर्व अतिरेकी हे जाकीर मुसाच्या गजवल-उल-हिंद-अन्सार गटाचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुसानंतर संघटनेतील क्रमांक दोनचा अतिरेकी काबीज सोलिहा ऊर्फ रेहान खान याचाही मृतांत समावेश आहे. मुसा हा काश्मीरमध्ये सक्रिय अल-कायदाची नवी शाखा अन्सार गजवत-उल-हिंद या संघटनेचा प्रमुख आहे.

अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. इतक्यात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत ६ अतिरेकी टिपण्यात अाले. चकमकीदरम्यान लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. जाळपोळ करत सुरक्षा दलांवर दगडफेकही केली.
Musa organization Six militants killed

Post a Comment

 
Top