0
ते म्हणाले, हनुमान संपूर्ण जगाचे आहेत. प्रत्येक धर्माचे आहे. हनुमान मुसलमान असल्याचे आम्हाला वाटते.

लखनऊ- भाजप नेते बुक्कल नवाब यांनी गुरुवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केेले. हिंदूचे आराध्य दैवत भगवान हनुमान मुसलमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हनुमान यांच्या नावावरून आमच्या समाजात रहमान, रमजान, फरमान, जिशान, कुर्बानसारखी नावे ठेवली असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमानास दलित म्हटले हाेते. त्यामुळे निर्माण झालेला वाद अजून शमला नसताना पुन्हा बुक्कल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

ते म्हणाले, हनुमान संपूर्ण जगाचे आहेत. प्रत्येक धर्माचे आहे. हनुमान मुसलमान असल्याचे आम्हाला वाटते. म्हणूनच आमच्या समाजात रहमान, रमजान, फरमान, जिशान, कुर्बान अशी नावे आहेत.. लखनऊमधील भाजप अल्पसंख्याक माेर्चाच्या कार्यक्रमात बुक्कल नवाब यांनी अयाेध्येतील वादग्रस्त जागेचा उल्लेख करत अचानक मशीद उभारण्याचे वक्तव्य केले. यावेळी मंत्री मुख्तार अब्बास नकवीसुद्धा हजर हाेते.BJP leader Nawab says, Lord Hanuman is Muslim!

Post a Comment

 
Top