0
गोशाळेत करा गायींची सेवा आणि कमावा लाखो रुपये

नवी दिल्ली- गोशाळा उभारुन लाखो रुपये कमवता येतात हे सिद्ध केले आहे राजस्थानमधील श्री गोपाल गोशाळेने. झुंझुनू शेखावटी परिसरातील 110 वर्षांपुर्वीची ही गोशाळा हरिनारायणजी यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जमनाधरजी टीबडा आणि मख्खनलालजी खेतान यांनी या गोशाळेची जबाबदाही स्विकारली. सध्या या गोशाळेत 1258 गायी असून 25 कर्मचारी या गायीचा सांभाळ करतात. या गोशाळेचे वैशिष्टे म्हणजे 2017-18 या वर्षामध्ये या गोशाळेने साडेतीन कोटींची कमाई केली आहे.

गायींसाठी खरेदी केला जातो 20 कोटींचा चारा

या गोशाळेत गायींच्या दुधापासून जवळपास 1 कोटी 10 लाखांची कमाई होते. त्याशिवाय केंद्र सरकारकडून या गोशाळेला 83 लाखांचे अनुदान दिले जाते. या गोशाळेत गायींसाठी 20 कोटींचा चारा खरेदी केला जातो. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, दरवर्षी या गायींच्या गोठ्यासाठी 20 लाखांचा खर्च होतो. या गोशाळेचे खास वैशिष्टे म्हणजे सुरवातीला 31 सदस्यांनी मिळून या गोशाळेची स्थापना करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये जमा केले होते.Buisness of cow shelter that earns in millions of ruppees

Post a comment

 
Top