0
आंतरराष्‍ट्रीय नाणे निधीचे (आयएमफ) संचालक गॅरी राइस यांना आरबीआय संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर  केंद्रीय बँकाना काम करण्‍याचे स्‍वातंत्र्य असावे, असे उत्तर दिले. त्यांना सध्या सुरु असलेल्या आरबीआय आणि सरकारमधील स्वायत्तता विषयक वादासंर्भात प्रश्न विचारला होता.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या घडामोडींविषयी आयएमएफचे संचालक गॅरी राइस म्हणाले, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व ती आयएमएफसाठी एक महत्त्वपूर्ण  भागीदार ठरली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आरबीआयची प्रमुख भूमिका राहिली आहे. तसेच आरबीआय हा आएमएफचा महत्वाचा पार्टनर आहे. 

आंतरराष्ट्रीय अनुभव पाहता केंद्रीय बँकेला त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कामकाजासंदर्भात स्वातंत्र्य दिले पाहिजे. उर्जित पटेल यांच्‍या राजीनाम्‍याविषयी विचारल्‍यानंतर, ते म्‍हणाले, महागाई रोखण्यात उर्जित पटेलांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा तसेच नवीन आलेले गव्हर्नर दास यांनाही आयएमफचे संचालक गॅरी राईस यांनी  शुभेच्छा दिल्‍या.

Post a Comment

 
Top