0
उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सोलापूर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (ता.24) पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी आदित्य, रश्मी ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सभेच्या स्थानी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाषणापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विठाई या बससेवेचे अनावरण केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...
>> या मैदानावर सभा घेण्याची कोणी हिम्मत करत नाही. म्हणून येथे सभा घेतली. कारण बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र दुसऱ्या मैदानावर सभा घेऊच शकत नाही.
>> शेतकऱ्यांसह सध्या अनेक समस्या आहे. कशाकशावर बोलावे कशावर नाही असा प्रश्न आहे.
>> जगज्जेते असल्याचा समज एका पक्षाने पसरवला होता. पंचायत समिती असो की, लोकसभा आम्हीच जिंकणार असेच सांगितले जात होता. 
>> जगज्जेते असलेला जो समज पसरवला होता त्याच्या ठिकऱ्या पाच राज्यांनी उडवून टाकल्या. 
>> पाच राज्यांपैकी मिझोरम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली 
>> छत्तीसगडमध्ये बहुसंख्य आदिवासी आहेत. त्याठिकाणी पर्याय नसल्याने छत्तीसगडने आधी घर स्वच्छ करायचे म्हणून विरोधात मतदान केले.
>> महाराष्ट्रानेही हेच धाडस दाखवावे. 
>> राममंदिर बांधणारच पण झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो. 
>> आज पंढरपुरातही त्याचसाठी आलो आहे. तू झोपला असला तरी हिंदु जागा आहे हे मला कुंभकर्णाला सांगायचे आहे.
>> कुंभकर्णा वेळेवर जागा हो नाही तर पेटलेला हिंदू तुला जागा करेल
>> सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार
>> हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागले आहेत
>> ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं वाकडं केलं, त्यांचं वाकडं कर असं विठुरायाला साकडं घातलं
अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरजी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले आहे. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
त्यापूर्वी वारकरी संप्रदायातील महाराजांचे कीर्तन होणार आहे. यावेळी शिवसेनेत प्रवेशासह इतर राजकीय कार्यक्रम नसतील. तसेच ठाकरे हे राम मंदिर, शेतकरी समस्या आणि दुष्काळ आदी विषयावर ठाकरे बोलणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम, संयोजक आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.
27 एकर मैदानावर विराट सभा..
मार्केट यार्डसमोरील चंद्रभागा बसस्थानकाच्या 27 एकर मैदानावर ही विराट महासभा होत आहे. सभा न भूतो न भविष्यती ठरावी, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता महासभेला सुरुवात होईल. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होईल. चंद्रभागेच्या पैलतीलवर इस्कॉनच्या श्रीकृष्ण घाटावर आरती होईल. महासभास्थळी राज्यभरातील वारकरी संप्रदायातील संत, महाराज मंडळी उपस्थित असतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे कार्यक्रम.. 
सभेनंतर उद्धव ठाकरे सकीय विश्रामगृहावर जाणार आहेत. तेथून आरतीसाठी घाटावर पोहोचतील. महाआरतीनंतर मुंबईकडे रवाना होतील.Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray Today Pandharpur Visit Live Update

Post a Comment

 
Top