0
पोटात आढळलेल्या एका वस्तूमुळे समोर आली डॉक्टरांची भामटेगिरी

कानपूर - शहरातील सर्वोदय नगरात एका खासगी रुग्णालयाने अपघातात जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यू नंतरही ऑपरेशनच्या नावावर कुटुंबीयांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमधून डॉक्टरांच्या या कृत्याचा खुलासा झाला आहे. पीएम रिपोर्टमध्ये अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तथापि, अद्यापही मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिलेली नाही.

असे आहे प्रकरण...

- रिपोर्टनुसार, मृत 18 वर्षीय रोहित इलाहाबादचा रहिवासी होता.
- रोहित एका खासगी कंपनीत असिस्टंट फिटरचे काम करत होता. ही कंपनी कानपूर-फर्रुखाबाद रेल्वे लाइनवर इलेक्ट्रिफिकेशनचे काम करत होती.
- बुधवारी सकाळी 12 कर्मचारी पिकअपमधून साइटवर जात होते. बिल्हौरमध्ये जीटी रोडवर अपघात झाला. यात रोहित जखमी झाला.
- कंपनीचे मॅनेजर हर्षित यांनी त्याला सर्वोदय नगरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- आरोप आहे की, गुरुवारी ऑपरेशनच्या नावावर डॉक्टरांनी दोन वेळा 3.30 लाख रुपये जमा केले.
- शुक्रवारी जेव्हा कंपनीचे कर्मचारी रोहितला पाहण्यासाठी आयसीयूमध्ये पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पीएम रिपोर्टमधून काय समोर आले?
- रिपोर्ट्सनुसार, रोहितचे पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर्स म्हणाले की, त्याचा मृत्यू बुधवारी रात्रीच झालेला होता. तर हॉस्पिटलकडून पोलिसांना पाठवण्यात आलेल्या माहितीत शुक्रावारी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
- पीएम करताना मृताच्या पोटावरील वरचा स्तर कापलेला होता. टाक्यांऐवजी टेप चिकटवण्यात आला होता. एवढेच नाही, पोटात रुईचे 28 तुकडेही आढळले आहेत.
- यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, जर रोहित जिवंत होता तर त्याच्या पोटात रुई गेलीच कशी? दुसरीकडे, जर तो मेला होता, तर त्याचा मृतदेह आयसीयूमध्ये का ठेवण्यात आला. स्थानिक पोलिसांनी पीएम रिपोर्ट वाचल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Fake operation by doctors case In kanpur Latest News And Updates

Post a Comment

 
Top