ईशा-आनंदचे वेडिंग रिसेप्शन 14 डिसेंबरला मुंबईच्या जियो गार्डनमध्ये होईल.
मुंबई - उदयपूरमध्ये दोन दिवस चाललेल्या ग्रँड प्री वेडिंग सेरेमनीनंतर बुधवारी मुंबईत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे शाही लग्न अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटिलियामध्ये झाले. दुपारी 3 वाजता वरात आल्यानंतर विवाह सोहळा सुरू झाला. मुकेश आणि अनिल अंबानी अँटिलियाबाहेर बराचवेळ वऱ्हाडी आणि पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.
रिसेप्शनमध्ये एआर रेहमान करतील परफॉर्म
मुकेश अंबानी वऱ्हाडींबरोबर थिरकतानाही दिसले. अनंत आणि आकाश अंबानींबरोबर आकाशची होणारी पत्नी श्लोका मेहताही वऱ्हाडींचे स्वागत करताना दिसली. यादरम्यान अनंत आणि आकाश जोधपुरी जॅकेटसह सलवार-कुर्ता आणि अनंत पारंपरिक पोषाखात घोड्यावर बसलेले दिसले. वऱ्हाडींसमोर विविध कलाकार सादरीकरण करताना दिसले. लग्नानंतर 14 डिसेंबरला मुंबईतच रिसेप्शन होणार असून त्यात ऑस्कर विजेता संगीतकार एआर रेहमान परफॉर्म करणार आहे.
राजकारण चित्रपट क्षेत्रातील बड्या हस्तींची उपस्थिती
ईशाच्या लग्नासाठी अनेक बड्या हस्तींची उपस्थिती होती. पिरामल इंडस्ट्रीचे मालक अजय पिरामल आनंद वऱ्हाड घेऊन अँटिलियात पोहोचले. वऱ्हाडींचे स्वागत करण्यासाठी ईशाचे भाऊ अनंत आणि आकाश घोड्यावर स्वार झाले होते. नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, अभिनेता अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि आमीर खानसह अनेक बड्या हस्ती आल्या होत्या. ईशा-आनंदचे वेडिंग रिसेप्शन 14 डिसेंबरला मुंबईच्या जियो गार्डनमध्ये होईल.
पाहुण्यांसह माशांच्या रुपात दिसले कलाकार
पाहुण्यांबरोबर वरातीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या वेशभुषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुरुष कलाकार सी-हॉर्स टॉपमध्ये होते तर महिला माशांच्या वेशभुषेत होत्या. त्यांची हेअरस्टाइलही स्टार फिशसारखी होती. पाहुण्यांसाठी फॉर्मल ड्रेसकोड होता.

Post a Comment