0
मनोहर जोशींच्या प्रशासन या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत पार पडलं. याप्रकाशन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते. यावेळी आता ८१ वर्षांचा झालो आहे, शरीर थकतंय, माझ्यामागे अनेक नेते आहेत त्यांना रोखून धरणं ठीक नसल्याचं सांगत मनोहर जोशींनी ही विनंती केली.
परंतु, सर कधी निवृत्त होऊ शकतात का? कारण निवृत्ती यात सुद्धा एक वृत्ती आली आहे. आणि ज्यांची निवृत्ती होण्याची वृत्ती असते तो जन्मजात हा निवृत्त असतोच. उद्या मी मनोहर जोशी यांचा राजीनामा स्वीकारलेही पण सर उद्या मातोश्रीत येतील आणि मला काही तरी काम सांगा असं विचारतील असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा नाकारला.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर सडकून टीकाही केली. भाजप सरकार सत्तेवर येण्याची खात्री नव्हती, त्यामुळे हे सरकार निवडणुकीपूर्वी आश्वासनं देत गेलं आता पुर्तता करताना त्याचा ताण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होतोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी  केली. मात्र आमचा भगवा राज्यावर फडकणारच आणि अयोध्येत मंदिर होणारच अशी खात्री असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं. आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं होतं. गडकरींच्या याच  वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी आज निशाणा साधला.

Post a Comment

 
Top