एका झटक्यात बनला कोट्याधिश
अमेरिका. अमेरिकेतील एक कॉलेज स्टूडेंट दिर्घकाळापासून आपल्या आजीच्या घरातील गॅरेजला पसारा समजण्याची चूक करत होता. परंतू एक दिवस त्याने गॅरेज उघडले तर त्याचे नशीब पालटले. एरिगन नावाच्या या विद्यार्थ्याने एका ब्लॉगमध्ये सांगितले की, त्याला वाटले की, 20 वर्षांपासून या गॅरेजमध्ये पसारा पडलेला आहे. परंतू यामध्ये त्या काळातील लग्जरी स्पोर्ट्स कार उपलब्ध होत्या.
गॅरेजवर देत नव्हता लक्ष
एरगिनने सांगितले की, त्याच्या घरात दोन गॅरेज होते. यामुळे या गॅरेजकडे लक्ष देत नव्हता. परंतू त्यावेळी अचानक त्याला ते गॅरेज पाहण्याची इच्छा झाली. त्याने गेट उघडले तर त्याला झाकलेल्या दोन कार दिसल्या. हे पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. या त्या काळातील लॅम्बोर्गिनी आणि फेरारी कार होत्या.
3 कोटी होती किंमत
- एरगिनने सांगितले की, गॅरेजमध्ये 1981 च्या लॅम्बोर्गिनी आणि फेरारी 308 धूळ खात पडली होती. या दोन्ही कारची किंमत जवळपास 3.5 कोटी रु((430,000 डॉलर) होती. त्याने सांगितले की, या का गेल्या 20 वर्षांपासून वापरण्यात आलेल्या नाहीत.
कुठून आल्या या कार
- ब्लॉगवर एरगिनने लिहिले, या कार माझ्या दिवंगत आजोबांनी खरेदी केल्या होत्या. माझ्या आजोबांना या कार किरायावर चालवून रेंटल बिझनेस सुरु करायचा होता. परंतू याच्या महागड्या इंशुरेंसमुळे हे होऊ शकले नाही. त्यांचा प्लान फ्लॉप ठरला. परंतू मला कळाले नाही की, मग त्यांनी या कार का विकल्या नाहीत. या कार 20 वर्षांपासून येथे का पडलेल्या आहेत, याचा मला अंदाज नाही.
व्हायरल झाले फोटोज
80 च्या दशकातील या सुपरकारला 20 वर्षांपासून कुणीही स्पर्श केला नव्हता. एरगिनने सोशल मीडियावर हा फोटो टाकला तेव्हा त्याला अनेक कमेंट आल्या. काही लोकांनी विचारले की, या कार कितीमध्ये विकणार? तर काही म्हणाले की, जगातील सर्वात चांगल्या वस्तूंना असे भंगारसारखे का ठेवले आहे? एरगिनने सांगितले की, आता या विंटेज कार बनल्या आहेत. या विकण्याचा माझा सध्या काहीच विचार नाही.

Post a Comment